११ वी केंद्रीय २०१३-१४ FINAL LIST परिपत्रके येथे पहावीत


राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (आर.एम.एस.ए.)


उद्दिष्टॆ व योजना :

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा (आर.एम.एस.ए.) उद्देश असा आहे की ,
       "माध्यमिक शिक्षणाचा विस्तार आणि त्याच्या मानकांमध्ये इयत्ता ०८ वी ते १० वी मध्ये सुधारणा करणे, देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात प्रत्येकी ५ कि.मी. अंतरावर इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण पोहोचविणे आहे."

   राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (आर.एम.एस.ए.) हा भारत सरकारचा सन २००९ मध्ये सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे.ज्याचा उद्देश माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण (यु.एस.ई.) असा आहे. सरकारतर्फे सुरू करण्यात आलेला देशातील लाखो मुलांना प्रारंभिक शिक्षण देणारा सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आढळ्तो आणि म्हणूनच देशात ह्या कार्यक्रमाची माध्यमिक स्तरावर विस्तार करण्याची गरज भासू लागली आहे.मानव संसाधन विकास मंत्रालयाने ११व्या पंचवार्षिक योजनेमध्ये २०,१२० कोटी रुपये खर्च करुन राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा (आर.एम.एस.ए.) ह्या नावाने माध्यमिक शिक्षण योजनेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे .सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे, मोठ्या प्रमाणावर उच्च प्राथमिक इयत्तांमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी बाहेर पडत आहेत. ज्यामुळे माध्यमिक शिक्षण सुरू करण्याची गरज निर्माण होत आहे. मानव संसाधन विभागाने एका ठिकाणी नमुद केलेले आहे.

लक्ष्य आणि उद्देश:

" माध्यमिक शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे (यु.एस.ई.) आव्हान पूर्ण करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाच्या संकल्पनात्मक रचनेमध्ये अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. या संबंधातील मार्गदर्शक सिध्दांत असे आहेत. जागतिक प्रवेश योग्यता, एकात्मता आणि सामाजिक न्याय, प्रासंगिकता आणि विकास व अभ्यासक्रमात्मक आणि रचनात्मक तत्वे. माध्यमिक शिक्षणाच्या जागतिकरणाने एकात्मतेकडे पाऊले उचलायला मदत होते. सामान्य शाळा ह्या उद्देशाने प्रोत्साहन मिळेल. जर संस्थेत अशा प्रकारची पध्द्त स्थापन झाली तर, सगळ्या प्रकारच्या शाळा, विनाअनुदानीत खाजगी शाळांसहित सर्व शाळा, वंचित आणि खालच्या समाजातील मुलेमुली आणि गरिबीरेषेच्या खालची कुटुंबे (बी.पी.एल.) यात प्रवेश घेऊन माध्यमिक शिक्षणाच्या जागतिकरणात भाग घेतील. "


पुढील पान